Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बारावीच्या परीक्षेत काही केंद्रावर आतुन तमाशा बाहेरुन किर्तन अशी अवस्था सुरु आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम काही संस्था चालकांकडुन सुरु आहेत.
पुण्यातील एका एजंटकडुन पाथर्डीत १५० विद्यार्थी आणलेले आहेत. त्यांचा शाळा प्रवेश स्थानिक विविध महाविद्यालयातुन दाखलेला आहे. काही भागात काँपी बंद करण्यात प्रशसानाला यश आले असले तरी काही केंद्रावर रासरोसपणे कॉपी सुरु आहे. पालकांच्या झुंडीच्या झुंडी केंद्राच्या बाहेर पळताना दिसत आहेत. तालुक्यातील बारा परीक्षा केंद आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/unnamed-file-2.jpg)
ग्रामीण भागातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात रासरोसपणे कॉपी पुरविली जाते. यामधे पालकांचा सहभाग मोठा आहे. कॉपी पकडणाऱ्या पथकाला पालकांकडुन शिवीगाळ करण्याचे किरकोळ प्रकारही सुरुच आहेत. आमच्याकडे दगड आहेत याची जाणीव कॉपी पथकाने ठेवावी असा सजज्ड दम पालक पथकातील सदस्यांना देत आहेत.
नोकरी करायची तर निट करा आमची पोर पोलिस भरतीला जातील त्यात अडथळा ठरु नका असा इशारा पालक देत आहेत. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालुन पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. पा थर्डी तालुक्यातील शहरासह काही केंद्रावर कॉपीला आळा घालण्यात यश आले आहे. मात्र ग्रामीण भागातील काही केंद्रावर रासरोसपणे कॉपी सुरु आहे. तेथील शिक्षकावर जिल्हाधिकारी वॉर रुममधुन कारवाई होण्याची शक्यता आहे.