अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करून १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त करून ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला आहे.
यावेळी बापू गायकवाड (रा. देवळाली प्रवर) याच्याकडून 42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन
( किं.अं.) तसेच 2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.), सोमनाथ बर्डे याच्या कडूनब28,000/- रु. कि.चे 400 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन
( किं.अं.) व 1,000/- रू किमतीची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.), रमेश गायकवाड 31,500/- रु. कि.चे 450 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन
( किं. अं.) व 1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.), आशाबाई बाळासाहेब गायकवाड या महिलेकडून 24,500/- रु. कि.चे 350 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन
( किं.अं.) व 2000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं, वैभव गायकवाड याच्याकडून 35,000/- रु. कि.चे 500 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन
( किं.अं.) व 2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.) तसेच ज्ञानेश्वर रामकिसन भागवत याच्याकडून 900 रु. कि.च्या 15 (देशी बॉबी संत्रा) दारू च्या बाटल्या प्रत्येकी 60 रुपये किमतीच्या जप्त केल्या आहेत.
या कारवाईत एकूण १ लाख ७३ हजार ४०० रुपये वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे देवळाली प्रवरा परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईचे देवळाली प्रवरा येथील महिलांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, ASI. राजेंद्र आरोळे, H.c. सुरेश औटी, H.c प्रभाकर शिरसाठ पो. कॉ. नितीन शिरसाठ, शशिकांत वाघमारे आदींनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम