दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील आरोपींना त्वरित अटक करा

Published on -

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करा, असे आदेश खासदार सदाशिव लोखंडे यांनी पोलीस अधिकान्यांना दिले. दूधगंगा पतसंस्थेतील गैरव्यवराबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संस्थेचा अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार भाऊसाहेब कुटे व व त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

असतानाही या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यामुळे ठेवीदार संतप्त झाले आहे. या गैरव्यवरातील सर्व आरोपींना अटक करावी व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या, या मागणीसाठी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी शुक्रवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जन आक्रोश व उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता. खासदार सदाशिव लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांची काल दुपारी भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा केली. यावेळी ठेवीदारांनी आपली कैफियत मांडली.

या आर्थिक अपहारातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुठे व त्याचे कुटुंबीय खुलेआम फिरत आहे. अनेकांनी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेले आहे. असे असतानाही पोलीस त्याला अटक का करीत नाही? असा संतप्त सवाल यावेळी ठेवीदारांनी उपस्थित केला.

या आर्थिक अपहारातील आरोपींना त्वरित अटक करावी, असे खासदार लोखंडे यांनी यावेळी सांगितले. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत खासदारांची बैठक असून या बैठकीत आपण दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराची चर्चा करणार आहोत.

संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर घरले.

मुख्य सूत्रधार हा मुलाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन गेल्याचे काहींनी पाहिले असताना पोलिसांना हा आरोपी का सापडत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

यावेळी आंदोलनकत्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केली. मात्र आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी ठेवीदारांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe