कोरोनाचा विस्फोट झालेल्या नवोदय विद्यालया बाबत महत्वाची बातमी समोर…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अहमदनगर – जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

नुकळतेच पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच शिक्षक अशा सर्व 90 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान डिसेंबर मध्ये नवोदय विद्यालयात करोनाचा शिरकाव झाला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा महसुल विभाग पारनेरचे प्रशासन सर्व यंत्रणा कामाला लागली होती.

आरोग्य यंत्रणा कामाला लागत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. यात 85 विद्यार्थी व 6 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे 91 जण बाधीत आढळले.

या सर्वावर पारनेर ग्रांमीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम होती परंतु त्याचे अहवालात पाँझीटिव्ह आले होते. तर यातील 36 जणांच्या पुढील तपासण्या करण्यासाठी पुण्याला नमुने पाठवले होते.

आठ दहा दिवस उपचार घेतल्यानंतर सोमवारी यातील 14 जणांना घरी सोडण्यात आले होते. तर आज सर्व विद्यार्थी व शिक्षक बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत.

सध्या नवोदय विद्यालयात विलगीकरण केलेले दहावी व बारावीचे विद्यार्थी वगळून इतर 226 विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे .तर उपचार घेतलेले 85 विद्यार्थी व 6 कर्मचारी ही सुखरूप घरी गेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News