Ahmednagar News : नगरकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ भागातील थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमधील थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाने विविध उपाययोजना केल्या. परंतु अनेक प्रयत्न करूनही बहुतांश थकबाकीदारांर्नी कर भरलेले नाहीत.

आता मनपा प्रशासन ऍक्शनमोड वर आले आहे. नागापूर परिसरातील मनपा हद्दीबाहेरील २६८ नळ कनेक्शन ४७.३७ लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत.

या नळधारकांना थकबाकी भरण्यासाठी अंतिम मुदत द्यावी व थकबाकी न भरल्यास कारवाई करावी, असे आदेश डॉ. जावळे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

नागापूर उपविभागात मनपा हद्दीबाहेर साईनगर, मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, आंधळे-चौरे नगर या भागात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो.

तेथे ३१० नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही नळ कनेक्शन धारकांनी पाणीपट्टीचा भरणा केलेला आहे. मात्र, २६८ नळ कनेक्शन धारकांकडे अ‌द्यापही ४७ लाख ३७ हजार ८६ रुपयांची थकबाकी आहे.

त्यामुळे या भागात पाणीपुरवठा करण्याकरिता नगर-मनमाड रोडवर बसविण्यात आलेले व्हॉल्व बंद करून पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्याला आयुक्तांनी मंजुरी देत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जर कुणी थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली किंवा इतर काही कारणास्तव उशीर केला तर मात्र नळकनेक्शन धारकांना वरील कारवाईस सामोरे जावे लागेल यात शंका नाही. मनपाने मध्यंतरी सवलती दिल्या, तसेच वसुलीसाठी सक्त पावले देखील उचलली होती.

अनेक ठिकाणी थकबाकीदारांची नावांचे फलकही लावण्यात आले होते. परंतु असे असतानाही अनेकांनी अद्यापही भरणा न केल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe