अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आता कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय त्या तुलनेत विक्री होत नाही त्यामुळे रविवारी व सोमवारी येथील कांद्याचे व्यवहार हे बंद राहणार असल्याचे निर्णय प्रशासनाने आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
नगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समिती आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक असते.
बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, त्या तुलनेत कांद्याची विक्री होत नाही. त्यामुळे नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याचे दोन लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र, अडचण झाली आहे. एकीकडे वातावरणामुळे कांद्याच्या दरात घसरण होत आहे. तर दुसरीकडे विक्रीचाही पर्याय बंद आहे.
येथील बाजार समितीमध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी, कडा, पाटोदा या भागातील कांद्याची आवक होत असते. पण आता दोन व्यवहार हे बंद राहणार आहेत.
सध्या उन्हाळी हंगामातील साठवणूकीतल्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. शिवाय कांद्याचे मार्केटही स्थिर नाही. त्यामुळे खरेदी आणि विक्रीचेही नियोजन व्यापाऱ्यांना सहज शक्य होईना झाले आहे.
यातच आता नव्याने खरीप हंगामातील कांदा बाजारात दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून आता खरेदी केलेला कांदा दोन दिवसांमध्ये मार्गी लावायचा आणि त्यानंतरच कांद्याची खरेदी सुरु करण्याचा निर्णय झाला
आहे. पावसाने कांदा भिजल्यामुळे आवक मोठी होत असली तरी खरेदीदार नाही. मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने दोन दिवस बंद करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम