कोपरगावातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी…पाणी जपून वापरा कारण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- गोदावरी डावा कालवा उपविभाग यांनी कॅनॉल दुरुस्ती करण्याचे काम सुरू केलेलं आहे. यामुळे याचा थेट परिणाम शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रक यावर होणार आहे.

यामुळे नागरिकांनी देखील पाणी काटकसर करून वापरावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.

गोदावरी डावा तट कालवा उपविभाग कोपरगाव यांचे दि .9 नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार अस्तीत्वात असलेला पाणी साठा दोन महिने पुरविबाबत कळविण्यात आलेले आहे.

तसेच कॅनॉल दुरुस्तीचे काम चालु करणार आहे. त्यासाठी अस्तीत्वात पाणीसाठा आवर्तन येईपर्यंत वापरणे आवश्यक असल्याने चार दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दि. 21 नोव्हेंबर पासून सहा दिवसाआड करण्यात येत आहे .

याची नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यव टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe