अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! तुम्ही पदवीधर असाल तर हे वाचाच…

Published on -

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीचा सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम १ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झालेला आहे.

१२ ऑक्टोबर अखेर जिल्ह्यात फक्त १२१ पदवीधरांंनी नाव नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. पदवीधर मतदार नाव नोंदणी कार्यक्रमात सर्व पात्र नागरिकांनी ‘नमूना १८’ मध्ये केलेला अर्ज आपल्या जवळचे मंडळ अधिकारी, तहसील किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी जमा करावेत.

नागरिकांच्या सोईसाठी पदवी प्रमाणपत्र, पदवी गुणपत्रिका व इतर अनुषंगीक कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळनिहाय अतिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News