Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील वाघेश्वरी देवीच्या मंदिरातील दानपेटी पंधरा दिवसांपूर्वी आज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केली पोलिस प्रशासनाने देखील घटनास्थळी येऊन चोरट्यांचा तपास सुरू केला.
परंतु शुक्रवारी खांडगाव येथील शेतकरी तुकाराम वांढेकर यांच्या उसाच्या शेतात चोरी गेलेली दानपेटी आढळून आली आणि त्या दानपेटीतील पैसे देखील सुरक्षित स्थितीत असल्याचे आढळून आले.
लोहसर येथील वाघेश्वरी मंदिरातील अज्ञात चोरट्याने चोरून नेलेली दानपेटी पंधरा दिवसानंतर शुक्रवारी तुकाराम वांढेकर यांच्या उसाच्या शेतात आढळली या पेटीची ग्रामस्थांनी बारकाईने पाहणी केली असता, दानपेटी फोडून त्यामधील पैसे काढून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न चोरट्यांनी केला असावा.
परंतु चोरट्यांना दानपेटी फुटलीच नाही उलट चोरट्यांनी दानपेटी फोडण्यासाठी वापरलेल्या दोन लोखंडी हातोड्या तुटून पडलेल्या ग्रामस्थांना या ठिकाणी आढळून आले. याचा अर्थ चोरट्यांनी देखील या वाघेश्वरी देवीच्या दानपेटी पुढे हात टेकले म्हणावे लागेल.
वाघेश्वरी देवीच्या दानपेटीत भाविकांनी टाकलेले दान सुरक्षित आढळून आल्याने लोहसर खांडगाव येथील भाविक भक्तांना देखील सुखद धक्का बसला आहे.
लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरातील दानपेट्या चोरून नेण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यानंतर गावचे सरपंच अनिल गीते पाटील यांनी विशेष खबरदारी घेत भैरवनाथ मंदिरातील व वाघेश्वरी मंदिरातील सर्व दानपेट्या बनवताना विशेष खबरदारी घेतली त्याचाच परिणाम या ठिकाणी दिसून आला
आणि चोरट्यांना दानपेटी उघडताच आली नाही. त्यांनी हतबल होऊन दानपेटी उसात टाकून फळ काढल्याचे यावरून दिसून येत असल्याचे सुरेश चव्हाण, राजेंद्र दगडखैर, देवेंद्र गीते यांनी सांगितले.