घोडेगावात कांद्याला 3400 तर राहात्यात मिळाला 3100 भाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल 38 हजार 981 गोण्या (21 हजार 829 क्विंटल) कांद्याची आवक झाली.

जास्तीत जास्त भाव 3400 रुपयांपर्यंत निघाले. तर राहाता बाजार समितीत 2678 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला 3100 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समिती

एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 2700 ते 3100 रुपये

कांदा नंबर 2 ला 1950 ते 2650 असा भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 1000 ते 1900 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला

तर गोल्टी कांदा 2300 ते 2600 व जोड कांदा 200 ते 900 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

घोडेगाव बाजार समिती

एक-दोन लॉटला 3300 ते 3400 रुपयांचा भाव मिळाला.

मोठ्या कलर पत्ती कांद्याला 3000 ते 3200 रुपये,

मिडियम सुपर कांद्याला 2400 ते 2500 रुपये,

गोल्टा कांद्याला 2400 ते 2700 रुपये,

गोल्टी कांद्याला 1800 ते 2200 रुपये,

जोड कांद्याला 500 ते 600 रुपये भाव मिळाला.

सरासरी भाव 2500 ते 2800 रुपयांपर्यंत मिळाला.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe