राक्षसवाडीवाडीत असेही ‘राक्षसी’ कृत्य, शेकडो मासे…

Published on -

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील तलावामध्ये अज्ञात व्यक्तीने ‘राक्षसी’ कृत्य केले. तेथील तलावात त्याने जिलेटीनच्या सहायाने स्फोट घडवून आणल्याने तलावातील शेकडा मासे मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे पाझर तलाव आहे. हा तलाव कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या तलावांमध्ये सध्या पाणी असून मोठ्या प्रमाणामध्ये मासे आणि इतर जलचर प्राणी-पक्षीही आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या तलावातील पाण्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या वापरून स्फोट केला.

यामुळे या तलावामध्ये असणारे मासे तसेच इतरही जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. तलावाच्या पाण्यावर आणि पाण्याबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मासे मरून पडलेले चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे.


हा तलाव कुकडी पाटबंधारे विभागाच्या ताब्यामध्ये आहे. या तलावांमध्ये पाण्यामध्ये स्फोट घेण्यासाठी त्या व्यक्तीने पूर्वपरवानगी घेतली का? असा प्रश्न उपस्थित करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. स्थानिकांना यासंबंधी माहिती असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe