Ahmednagar News : राहता तालुक्यातील श्री गणेश कारखान्याच्या परिसरातील अधिकृतपणे नोंदी केलेल्या वाकडी, पुणतांबा, अस्तगाव गटांतील श्री गणेशच्या कार्यक्षेत्रात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाची तोडणी केली जात
“असून ही तोड बंद करावी, असे आवाहन श्री गणेशचे अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते व संचालक मंडळाने केले आहे.

याबाबत पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की वाकडी, पुणतांबा, अस्तगाव या तिन्ही गटांतील क्षेत्राची नोंद साखर आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. तिन्ही गट श्री गणेश परिसरामध्ये असुन तरीही पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना व्यवस्थापनाकडून या गटांतील गावांमध्ये उसाची तोड केली जात आहे.
या गटांत श्री गणेशचे अधिकृत सभासद आहेत. तिन्ही गटांतील परिसरात रोज अंदाजे ५०० मेट्रिक टन उसाची तोडणी केली जात आहे. पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने या भागात ऊस तोडी चालू ठेवल्यास यावर्षी श्री गणेश कारखान्याचा गाळप हंगाम आपले उद्दिष्ट गालू शकणार नाही.
श्री गणेश कारखान्याच्या तसेच गणेश परिसरातील सभासदांच्या तसेच कामगार बांधवांच्या हितासाठी ही गोष्ट अपायकारक ठरू शकते. त्यामुळष गणेशच्या परिसराच्या कार्यक्षेत्राती डॉ. विखे पाटील कारखान्याने ऊसतोड करू नये, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.