अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यात शिर्डी नगरपंचायतचा समावेश होता.
मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिर्डीत नगरपरिषद करण्यात यावी यासाठी सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला.
अखेर शिर्डीत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. नगरपरीषद झाल्याबाबतची वार्ता समजल्यानंतर शिर्डी नगरपंचायतच्या प्रवेशद्वाराजवळील पायर्यांवर उपस्थित शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या हस्ते गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.
सर्व पक्षांच्या प्रयत्नांमुळे 13 जागांसाठी केवळ 2 उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकले. हे दोन्ही अर्ज अपक्ष होते. नियमानुसार किमान 50 टक्के उमेदवार असतील तरच निवडणूक घेता येते. त्यामुळे प्रशासनाला ही निवडणूक रद्द ठरली.
शिर्डीकरांनी यापूर्वी, करआकारणी सोसणार नाही, या कारणास्तव असेच आंदोलन करून नगरपंचायत जन्माला घातली होती. आता करआकारणी सोसू, असे गृहित नगरपरिषदेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिर्डीत नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला आहे.
नगरपरिषद लागू होताच आज शिर्डीकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढ वाटले. या निर्णयामुळे शिर्डीत आनंदोत्सव केला जात आहे. शिर्डी नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी अपवाद वगळता शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
शिर्डी ग्रामस्थांच्या एकजुटीला व सामूहिक प्रयत्नाला अखेर यश आले. शिर्डी नगरपंचायतचे रूपांतर शिर्डी नगरपरिषदेत झाल्याची वार्ता आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व शहरातील नागरिकांना काल.दि.18 शुक्रवार रोजी सकाळी समजताच शिर्डी ग्रामस्थांनी साईनामाचा जयघोषात आनंद व्यक्त करत
फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. यावेळी शहरात सर्वत्र जल्लोष साजरा केला. नगरपंचायतीचे रूपांतर शिर्डी नगरपरिषदेत झाल्याचे समजताच शिर्डी शहरातील सर्वपक्षीय संघटना नेते व ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयासमोर एकत्रित येऊन साईनामाचा जयघोष केला असून
फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून गावातून मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. दरम्यान, शिर्डी नगरपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्याचा आनंद शिर्डी करांनी जल्लोषात व्यक्त केला असला तरी शासन स्तरावर याबाबत वृत्त लिहीपर्यंत कुठलाही अध्यादेश प्राप्त झाला नव्हता.
नगरपरिषद झाल्याची माहिती ऐकीव व वास्तव असली तरी याबाबतचा अध्यादेश केव्हा निघतो व शिर्डीकरांना केव्हा प्राप्त होतो याबाबत मोठी उत्सुकता असून याकडे समस्त शिर्डी ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, नितीन उत्तम कोते, विश्वस्त महेंद्र शेळके, कमलाकर कोते, रमेश गोंदकर,
ज्ञानेश्वर गोंदकर, सुधाकर शिंदे, निलेश कोते, सुजित गोंदकर,दादासाहेब गोंदकर, राजेंद्र कोते, सचिन शिंदे, अशोक कोते, अरविंद कोते, आप्पासाहेब कोते, प्रमोद गोंदकर, हरिश्चंद्र कोते, दत्तात्रय कोते, सुनील गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, राकेश कोते, शब्बीरभाई सैय्यद, समीर शेख, सलीम शेख,
साईराम गोंदकर, सोमनाथ कावळे, नरेश सुराणा, राम आहेर, अँड अविनाश शेजवळ,उमेश शेजवळ, अँड विक्रांत वाकचौरे, अमोल बानाईत, हरीराम राहाणे, शफीक शेख, नानासाहेब काटकर, स्वराज त्रिभूवन, अनिल पवार, गोटू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.