अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- हात-पाय थरथरत असल्याने व जवळ दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने मित्राला फोन करून बोलून घेतले. मित्राकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने डोक्यात वीट घालून त्याला जखमी केले.
प्रकाश उमाजी पाटोळे (वय 52 रा. सर्जेपुरा, अहमदनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मित्र अन्वर रमजान पठाण याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील सर्जेपुरा भागात ही घटना घडली. अन्वर पठाण याने प्रकाश पाटोळे यांना फोन करून सर्जेपुरा येथील साईदीप बेकरी येथे बोलून घेतले.
अन्वरने प्रकाश यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. माझ्याकडे पैसे नाही, तर कुठून देऊ, असे प्रकाश अन्वरला म्हणताच त्याचा त्याला राग आला.
अन्वरने प्रकाशला शिवीगाळ करत तेथे पडलेला वीटेचा तुकडा त्याच्या डोक्यात घातला. प्रकाश पाटोळे हे जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.