Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली, तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेत. नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत,
या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत. जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला, शेतकऱ्यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत. याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या.

खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यादेखील महिलांसोबत जेवण बनवल, त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारला आहे. आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटल्या आहेत.
आमच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना , आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल असे देखील इथे बोलले जातय.