अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत कांदा 2200 तर सोयाबीन 6301 रुपये क्विंटल !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  राहाता बाजार समितीत काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 4225 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 1850 तर लाल कांद्याला 2200 रुपये इतका भाव मिळाला.

सोयाबिनला जास्तीत जास्त 6301 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 4 हजार 225 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 1550 ते 1850 रुपये तर लाल कांद्याला 1800 ते 2200 असा भाव मिळाला.

कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1000 ते 1500 रुपये, लाल कांद्याला 1250 ते 1750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 450 ते 950 रुपये तर लाल कांद्याला 500 ते 950 भाव मिळाला.

गोल्टी उन्हाळी कांद्याला 1300 ते 1500 रुपये व लाल कांद्याला 1500 ते 1700 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 400 रुपये व लाल कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या 380 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 96 ते 120 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 61 ते 95 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला.

डाळींब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 15 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6150 ते जास्तीत जास्त 6301 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6225 असा भाव क्विंटलला मिळाला.

मकाला 1499 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. सिताफळाला कमीत कमी 1000 तर जास्तीत जास्त 4000 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe