अहमदनगर : ‘या’ गावांत पत्नी सरपंच तर पती उपसरपंच ! सपत्नीक हाकणार गावगाडा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या. याचे निकालही लागले. अनेक ठिकाणी महिला राज आले. आरक्षण व राखीव जागा यामुळे महिलांना राजकारणात चांगल्या संधी मिळत आहेत.

परंतु खरी गम्मत तर पुढेच झाली. नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीत काही महिला संरपंचांचे पती हे उपसरपंच झाले. त्यामुळे आता पती-पत्नी मिळून संसारगाडा चालवणारी जोडी आता गावगाडा एकत्रित चावलताना दिसणार आहे.

यात पत्नी सरपंच असल्याने तिच्या अधिपत्याखाली पतीला करभार पाहावा लागणार आहे.

मागील एक दोन दिवसात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. नगर तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूक होत्या त्यात निंबोंडी ग्रामपंचायत वगळता सात ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.

यात आता वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीचा कारभार पती-पत्नी असे दोघे मिळून पाहतील. वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माजी सरपंच विजय शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या पत्नी विद्यमान लोकनियुक्त सरपंच सोनुबाई शेवाळे यांच्या अधिपत्याखाली त्यांना काम करावे लागणार आहे. म्हणजेच सपत्नीक गावगाडा ते चालवतील.

* अनेक ठिकाणी अनोखा पायंडा

अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अनेक ग्रामपंचायत मध्ये अनोखे पायंडे दिसले. म्हणजे अगदी सरपंच उपसरपंच यांचा शपथविधी करणे. हा कार्यक्रम देखील अगदी वाजत गाजत गुलालात करणे आदी.

काही ठिकाणी तर सरपंच व उपसपंच यांचाच पद्ग्रहण सोहळा व त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणूक देखील कोणत्या लेव्हलवर गेली आहे याचा अंदाजा येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe