बुऱ्हानगर येथील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन

बुऱ्हानगर येथील अली पब्लिक स्कूल (एनआयओएस) मान्यता प्राप्त येथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन गुजरात येथील हजरत मौलाना कारी इनायतुल्लाह इखर्वी यांच्या हस्ते करण्यात आले व प्रार्थना स्थळी कुराणपठण करण्यात आले.

यावेळी हाजी शौकत तांबोळी, अब्दु स्सलाम, अली पब्लिक स्कूलचे संचालक अंज़ अनवर खान, हाजी इरफान, हाजी इस्माइल, नसीर शेख, मुफ्ती अब्दुल रज्जाक, मौलाना जावेद नदवी, मौलाना युनुस, मौलाना याहया, मौलाना अशफाक, मौलाना रियाज, मौलाना अब्दुल रऊफ, मौलाना नसीर अहमद, मौलाना शफीक कासमी,

मौलाना मोइन, सय्यद खलील, निसार बागवान, अजीम राजे, हाजी फिरोज शफी, राजु जहागिरदार, असद ईरानी, अज्जू शेख, साहेबान जहागीरदार, नसीर सर, तनवीर भाई, अशरफ शेख, अजहर भाई आधी सह विद्यार्थ्यांचे पालक व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अली पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षण सोबत धार्मिक कुरांची देखील शिकवण मुस्लिम समाजातील मुला मुलींना देण्यात येत असून, येथे होस्टेल व प्रार्थना स्थळाचे शुभारंभ करण्यात आले.

ही संकल्पना स्व. मरहूम मौलाना अन्वर नदवी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून, या होस्टेल मध्ये विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासासह धार्मिक देखील बनला पाहिजे माणुसकी जपण्यासाठी माणसाने पहिले आपले धर्माचा अभ्यास केला पाहिजे

त्यामुळे ए फॉर अल्ला म्हटले जाते तसेच आर फॉर रामायण सुद्धा वाचली पाहिजे या संकल्पनेतून या हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन करण्यात आले व येथे शिक्षण सह धार्मिक वृत्ती देखील होणार तसेच येथे विद्यार्थी हा माणूस म्हणून घडवला जाणार असल्याची भावना संस्थेचे संचालक अंजर अनवर खान सर यांनी व्यक्त केली

तर गुजरात येथील हजरत मौलाना कारी इनायतुल्लाह इखर्वी यांचे धार्मिक व्याख्यान व दुवा पठण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद अनस कुरेशी यांनी केले तर आभार मोहम्मद अली खान यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe