अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील 334 शेतकर्यांचा कर्जमाफीसाठी समावेश आहे. तर शासकीय नोकरी व कर भरणार्या 895 शेतकर्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
जाहीर झालेल्या यादीमध्ये पिंपरी निर्मळ येथील पाच शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत तर 35 शेतकर्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

दरम्यान राज्यातील आघाडी सरकारने थकबाकीदार शेतकर्यांसाठी दोन वर्षापूर्वी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.
दोन लाखांपर्यंतच्या थकीत शेतकर्यांना यामध्ये कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रकीया अंतिम टप्प्यात असून नुकतीच यादी जाहीर केली आहे.
पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या पात्र शेतकर्यांना आधार प्रमाणिकरणासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत आहे. राहाता तालुक्यात यामध्ये 334 शेतकरी पात्र आहेत.
शासकीय नोकरी असणारे किंवा आयकर भरणार्या शेतकर्यांना कर्जमाफीसाठी अपात्र करण्यात आलेले आहे. संगणकीकृत ऑनलाईन माहितीच्या आधारे तालुक्यातील अशा 895 शेतकर्यांचे कर्जमाफीचे अर्ज फेटाळण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













