१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर शहर व तालुक्यातील सलूनच्या दरामध्ये (दि. १) जानेवारी पासून वाढ करण्यात आली आहे.तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या बैठकीत दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाबा जाधव व शहराध्यक्ष रमेश सस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सलूनसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणवर वाढ झाली आहे.या बरोबर दुकानाचे भाडे, लाईट बिल तसेच इतर खर्च सलून व्यवसायिकांना परवडत नाही.गेल्या अनेक वर्षापासून सलूनचे दर वाढविण्यात आले नव्हते.मात्र वाढता खर्च व उत्पन्न याचा कुठलाच मेळ बसत नाही.त्यामुळे या महागाईच्या काळात उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते.
या सर्वांचा विचार करून, नाभिक समाजाच्या बांधवांची मागणी लक्षात घेता बैठकीत सलूनचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वाढती महागाईमुळे खर्चात वाढ झाली असून सौंदर्य प्रसाधने, वीजेचे बिल, गाळा भाडे याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिणामी दर वाढविण्यात आले आहे.
ग्राहकांनी नाभिक समाज बांधवाना सहकार्य करावे, असे आवाहन शहराध्यक्ष रमेश सस्कर, तालुकाध्यक्ष बाबा जाधव यांनी केले आहे. या बैठकीत गोपी सस्कर, अशोक सस्कर, सुनील गायकवाड, अतिप शेख, मयूर बिडवे, सागर सस्कर, राजेंद्र जाधव, विकास सस्कर, दत्तू रागीर आदी समाज बांधव उपस्थित होते.