इंदुरीकर महाराज म्हणाले देश टिकावा असे वाटत असेल तर मोबाईलचा…

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- तरुण टिकला तरच देश टिकेल म्हणून तरुणांनी वारकरी सांप्रदायाची तत्वे अंगीकारावीत, असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी केले. जामखेडजवळील आनंदवाडी माऊली फाटा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात इंदुरीकर महाराज बोलत होते.

ते पुढे म्हणाले, भोग हा संचितात असला तरच भेटतो म्हणून कर्मात असेल तेच भेटते, ज़ो भोग प्राप्त होतो तो संचितानेच प्राप्त होतो. रोग्याला रोग आवडत नाही, दारिद्रयाला दारिद्रय आवडत नाही, पण सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून ज़ीवनात चुकीचे काही करू नका. तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे, मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्य येते, यातून आत्महत्येसारखे प्रकारही घडत आहेत.

घर, गाव, देश टिकावा, असे वाटत असेल तर मोबाईलचा अतिवापर करू नये. आई-वडिलांना जीव लावा, ज़ीवनात कष्टाला पर्याय नाही, कष्ट केले तरच तुम्हाला चांगले भवितव्य आहे. सोशल मीडियाचा वापर कमी करावा, या वेळी महाराज़ांनी सासू, सुना मुले, तरुण, वृध्दांना उपदेश केला.

रामायणातील प्रसंग सांगताना रावणाने रामाच्या हातून मरण्याकरिताच सीतामातेला चोरून आणले होते. पर नारीविषयी तुम्ही मातृत्व भावना ठेवा, असा उपदेश महाराजांनी या वेळी केला.