अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज लसीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले होते. “मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”, असं वक्तव्य त्यांनी कीर्तन सांगताना केलं होतं.
त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाराज चर्चेत आले आहे. आता इंदूरीकर महाराज स्वत: लसीकरणासाठी जनजागृती करताना दिसणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदूरीकर महाराज यांच्याशी संपर्क करून त्यांना याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता लस घेऊ नका म्हणणारे इंदूरीकर महाराज स्वत: नागरिकांना लस घेण्यासाठी प्रबोधनातून प्रोत्साहन देताना दिसणार आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राजेश टोपे यांना किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी लसीकरणाबाबत केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राजेश टोपे यांनी मी इंदुरीकर महाराजांना फोन केल्याचं सांगितले.
लसीकरणाबाबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन करू असं विधान राजेश टोपेंनी केले. इंदूरीकर महाराज कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत.
इंदूरीकर महाराज कीर्तनाशिवाय समाजकार्यातही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. महाराजांनी अनेक मुलांची जबाबदारी उचलून त्यांच्यातून उत्तम कीर्तनकार घडविण्याचे काम करतात.
त्यामुळे इंदूरीकर महाराज यांच्या माध्यमातून राज्य सरकार आता लसीकरणासाठी जनजागृती करणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम