निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी मतदान केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., अ.नगर निवडणूक 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. (Ahmednagar election)

निवडणूकीतील मतदान व मतमोजणी ही पारदर्शक होणे करिता मतदान केंद्रामध्ये व मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक 18 डिसेंबर रोजी मतदान व मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे. परंतु विरोधी पॅनलकडून यापूर्वीच माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवून खोट्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

परंतु आमचा सहकार विभागातील शासकीय यंत्रणेवर पूर्ण विश्वास असून आतापर्यंतची सर्व प्रक्रिया त्यांनी कायदेशीर मार्गाने हाताळली आहे.

निवडणूकीतील मतदान व मतमोजणी ही पारदर्शक होणे करिता आमच्या पॅनलच्या वतीने विनंती करतो की, सदरची प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवून पार पाडण्यात यावी.

जेणेकरून निकालानंतरही विरोधी पॅनलकडून प्रशासनावर खोटे आरोप होणार नाहीत.तरी सदर अर्जाचा विचार करुन मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रामध्ये सी.सी. टी. व्ही. कॅमेरा बसविण्यात यावे अशी मागणी सहकार पॅनेलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe