देवदैठण येथे आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

Pragati
Published:

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील हजारो विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत योगासन व प्राणायाम करत योगदिन उत्साहात साजरा केला.

महर्षी दधिची ऋषी मंदिराच्या प्रांगणात २१ जुन हा आंतराष्ट्रीय योग दिवस ५वी ते १२ वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला.

यावेळी प्रशालेचे विज्ञान अध्यापक प्रमोद रुपनर यांनी योग दिनाचे व उत्तमआरोग्यासाठी योगासनांचे महत्त्व सांगितले .

मुख्याध्यापक विशाल डोके , शिक्षक मच्छिद्र बनकर ,सतिश झांबरे , प्रमोद रुपनर , शंकर गाडीलकर ,सतिश कौठाळे यांनी विद्यार्थ्यांसमवेत , ताडासन , त्रिकोनासन , पादहस्तासन , वज्रासनासह इतर योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी शिक्षकांसमवेत सर्व विद्यार्थ्यानी उत्साहाने योगासने केली . यावेळी ग्रामविकास अधिकारी सुरेश इगावे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक संदिप घावटे ,लक्ष्मण अहिरे , अमोल कातोरे , राजेंद्र जगताप , रमेश साळुंके ,निवृत्ती वेताळ ,संदिप वेताळ , मनोज परदेशी , ब्रिजेश मकर , एकनाथ वायाळ , प्रशांत खेमनर, गणेश वाजे ,सचिन पवार ,अश्विनी गायकवाड ,

वंदना गायकवाड ,अर्चना टोणगे , कांता मांडगे ,सोनाली वाघमारे , सुजाता पठारे , युवराज ससाणे ,आदेश पाचरणे , दिलीप मांढरे ,शंकर भालेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe