जिल्हा बँकेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार !

Published on -

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्हा सहकारी बँकेच्या विविध पदांवर घेण्यात येणाऱ्या भरतीच्या तोंडी मुलाखतीला १ मार्च पासून सुरुवात केली जाणार आहे.तक्रारी येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून यावेळी बँक प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांना प्रक्रियेची माहिती समजावून देत आहे.बँकेत विविध डिपार्टमेंट्ससाठी सातशे पदांची भरती चालू असून या भरतीसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे.

लेखी परीक्षा झाल्यानंतर भरतीचे काम करणाऱ्या कंपनीने मागील आठवड्यात मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या उमेदवारांच्या १ ते १५ मार्च दरम्यान मुलाखती होणार असल्याचे बँकेने कळवले आहे.

२०१७ साली झालेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रक्रियेची माहिती वेळोवेळी मिळाली नव्हती. एका उमेदवाराला गुणवत्ता यादीत येऊनही नियुक्ती पत्रच मिळाले नव्हते. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयाने या उमेदवाराला नियुक्ती देण्याचा आदेश दिला होता.

त्या पार्श्वभूमीवर यावेळी बँक प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांना जाहीर प्रकटनाद्वारे सूचना देत आहे.शासनाच्या एका पत्राचा आधार घेत राज्यातील जिल्हा बँकांनी नोकर भरतीत आरक्षण रद्द केले असून नगर बँकेनेही आरक्षण रद्द केले त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांकडे राज्यभरातून तक्रारी आल्या आहेत.

ऑनलाइन भरती…तरी निकालाला उशीर

ऑनलाइन भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचा निकाल लवकर येणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वच ऑनलाइन भरतीचे काम करणाऱ्या कंपन्या निकालाला उशीर करत आहेत.त्याबाबतचे कारण कंपन्या स्पष्ट करत नाहीत.

तलाठीच्या भरतीतही निकालाला खूप उशीर झाला होता.सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या वर्क वेल कंपनीच्या अनुभवाबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. याबाबत सहकार आयुक्तालयाने तपासणी करून हा अनुभव योग्य असल्याचा अहवाल दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe