सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांसह सर्वांची चौकशी ! महसूलमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश

Published on -

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगरः बु-हाणनगर येथील अंबिका देवीच्या मंदिरासमोरील सांस्कृतिक भवन कोणतीही नोटीस न बजावता पाडल्या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह सर्वांची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले आहेत, अशी माहिती अॅड. अभिषेक भगत यांनी दिली.

अॅड. भगत म्हणाले, बुऱ्हाणनगर या ठिकाणी २० फेब्रुवारी रोजी नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी दिलेल्या आदेशानंतर जे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते, ते अनाधिकृत आहे असे सांगत महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाला हाताशी धरुन सत्तेतील आमदारांनी पाडून टाकले. यानंतर अॅड. भगत यांनी नगरचे जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री, सचिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्याची महसूलमंत्र्यांनी दखल घेतली आहे, असे भगत यांनी सांगितले.

अंबिका देवीचे पुजारी अॅड. विजय भगत यांच्याकडे कायदेशीर सर्व परवानगी असताना मालकीच्या बांधलेल्या स्वतःच्या जागेवर सांस्कृतिक भवनाचे जाणीवपूर्वक कट कारस्थान करून फक्त खोट्या तक्रारीच्या आधारे कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कायदेशीर बांधकाम पाडले.

यात श्री देवीची कमान, पालखी त्यांचे नुकसान करून विटंबना करण्यात आली, असे भगत यांनी म्हटले आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे भगत यांनी सांगितले. या प्रकरणाची राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त यांना या प्रकरणाची स्वतः चौकशी करून अहवाल शासनाला सादर करावा, असे दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe