सरकार देतेय ना? मग कशाला वावड्या उडवतात; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची टीका

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले ना, शेतकऱ्यांकडे साडेसात एच. पी. चे बील मागायला कुणी आले का? सरकार देतेय ना? मग कशाला वावड्या उडवतात. सरकार कोणत्या दिशेने चालले,यापेक्षा आपण कोणत्या दिशेने चाललो आहे, याला महत्व आहे. अशी टीका आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली.

केवळ बॅनर फाडून राजकारण होत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन विकासकामे करावी लागतात. जीवनात तुम्ही मोठे व्हा. परंतु त्यासोबत इतरांना देखील मोठे करावे.

त्यामुळे आपण लोकप्रतिनीधी नात्याने भरीव निधी आणून तालुक्याचा विकास केला. म्हणून सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.

आमदार डॉ. लहामटे यांच्या तिरंगा जनसंवाद यात्रेचा २८ व्या दिवशी समारोप होऊन तालुक्यातील राजूर येथे नुकतीच सांगता सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी जि. प. सदस्य कैलासराव वाकचौरे, विनय सावंत, तालुकाध्यक्ष शरद चौधरी, सचिन नरवडे, सरपंच पुष्पाताई निगळे, पुष्पाताई लहामटे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आ. डॉ. लहामटे पुढे म्हणाले कि, २०१९ ला मला जनतेने निवडून दिले, त्यांना आपण काय देऊ शकलो, याचे ऑडिट करण्यासाठी तिरंगा जनसंवाद यात्रा काढली होती. त्यात २२७ गाव व वाड्यासह २७५गावांना भेटी दिल्या.

यात्रेच्या माध्यामातून गावगावात गेलो. काही ठिकाणी लोकांनी रस्ते मागितले, सभा मंडप मागितले, काही ठिकाणी ग्रामसेवक राहत नसल्याची तक्रार केली. त्यावर लगेच फोन करुन ग्रामसेवकांना सूचना करुन मार्ग काढले.

पाण्याचा प्रश्न सोडवला. पहिल्या लोकप्रतिधींसारखे केवळ आश्वासने दिली नाही तर प्रत्यक्ष कामे करून दाखवली. त्यामुळे जनता आपल्यासोबत असल्याचे त्यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe