अहमदनगर: लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झालेली असून विविध पक्ष संघटना यांचे लोकसभा प्रचाराचे रॅली, सभा यासारखे कार्यक्रम चालू आहेत. निवडणूकीचे अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाकडून आपली राजकीय ताकत दाखविण्याच्या उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत.
यामध्ये मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत तसेच सध्या लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असून विविध राजकीय पक्षांच्या वतीने प्रचारसभा, कॉर्नर सभा, विविध प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहमदनगर जिल्हयात महसूल स्थळ सिमेच्या हद्दीत दिनांक 16 एप्रिल 2019 रोजीचे 24 वाजेपर्यत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.
जिल्हादंडाधिकारी श्री.द्विवेदी यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य सक्षम अधिका-यांच्या पूर्व परवानगी शिवाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यात शस्त्रे, काठया सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे,
सध्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे,हावभाव करणे, अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य. समावेश आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तीना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यारजवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापणे आवश्यक आहे.
प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धर्मिक मिरवणुका, लग्नसमारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेणेस अगर मिरवणूक काढण्यास ज्यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक तथा सहाय्य पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू होणार नाहीत. असे ही एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
- Mahindra XUV 3XO खरेदीसाठी 200000 डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- Tata Motors चा मोठा धमाका ! नव्यानेच लॉन्च झालेल्या SUV च्या किमतीत 1.80 लाखांची कपात, वाचा डिटेल्स
- ‘हे’ आहेत 10 वर्षात करोडपती बनवणारे टॉप 5 Mutual Fund ! 3 वर्षात पैसे झालेत दुप्पट
- Creta ला टक्कर देणारी ‘ही’ SUV 1.32 लाख रुपयांनी स्वस्त! कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर?
- ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना देतोय 10 Bonus Share ! रेकॉर्ड डेट पण झाली फायनल