अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या महामारी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहे.
आता कोठे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे, यातच भाजी पाला विक्रेत्यांवर एक मोठे संकट समोर उभे राहिले आहे.

कोरोना संकटातील टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक नागरिक भाजीविक्रीचा व्यवसाय करत आहेत.
मात्र, महापालिका कर्मचारी ऐन सणासुदीच्या काळात भाजीविक्री करणाऱ्यांना मज्जाव करून रस्त्याच्या कडेला बसण्यास विरोध करत आहेत.
आर्थिक परिस्थिती सुरळीत होईपर्यंत त्यांना रस्त्याच्या कडेला भाजीविक्री करू देण्याची मागणी माहेर फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे करण्यात आली.
निवेदन देताना फाउंडेशनच्या अध्यक्ष रजनी ताठे, शबाना शेख, रोहिणी कांबळे, फरजाना शेख, रेखा शिंदे आदींसह भाजीविक्री करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.
आयुक्त मायकलवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. हातचा रोजगार गेल्याने अनेक महिला, पुरुष व युवकांनी रस्त्याच्या कडेला बसून किरकोळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
त्यातून त्यांचा दैनंदिन खर्च भागत आहे. सध्या मनपा कर्मचारी रस्त्याच्या कडेला बसलेल्या सर्वसामान्य गोरगरीब भाजीविक्रेत्यांना उठवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करू नये, असे निवेदनात म्हटले आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













