अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ग्राहकाने मास्क न लावता दुकानात आल्यास दहा हजार रुपये दुकानदाराला दंड हा कोणता न्याय?. प्रत्येक गिर्हाईक हे वस्तू घेतच असे नाही.
बर्याचदा चौकशी करून परत जात असते. दंड ज्यांनी शिक्षा केली त्यालाच करावा, अशी मागणी नगर शहरातील व्यापार्यांनी व्यक्त केले.
करोनामुळे अनेक व्यापारी हवालदिल झाले होते. छोटे व्यावसायिक दुकानदार, व्यापारी गेली दोन वर्षापासून अडचणीत आहेत. सध्या व्यवसायिक गाडी रुळावर आली आहे.
त्यामध्ये अशा नियमावली केल्या तर दुकानदारानी काय करावे, असा सवाल नगरच्या व्यापार्यांनी उपस्थित केला आहे. नुकतीच नगरमधील व्यापार्यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
तसेच दहा हजारांच्या त्या आदेशाला विरोध केला. धंदा कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती सध्या व्यापारी वर्गाची झालेली आहे. व्यापार्यांना असून जागेचे भाडे, बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाहीत.
कर्मचार्यांचा पगार निघत नाही. लाईट बिल भरायला पैसे नसतांना त्यांची अडचण कोणी समजून घेईल का,असा सवाल केला. शासनाने केलेल्या चुकीच्या नियमावली मान्य नाहीत.
या नियमावली बदलून ज्यांनी मास्क घातला नाही, त्या व्यक्तीस दंड करावा व्यापार्यांना करू नये, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम