गुन्हे दाखल झाले तरी चालेल – माजी आमदार शिवाजी कर्डिले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  राहुरी शहरवाॅइनशाॅप व बीअर बारच्या माध्यमातून पैसा मिळत असल्याने या मदिराच्या व्यवसायाला तातडीने मंजुरी देणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारची मंदिरे खुले करण्याबाबतची उदासिन भूमिका ही हिंदू धर्मावर घाला घालणारी आसुन येत्या आठवडे भरात धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा,

अन्यथा गुन्हे दाखल झाले तरी चालेल मंदिरे दर्शनासाठी खुले करण्याचे काम हाती घेण्यात येयील, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ५ महिन्यापासून बंद असलेले राज्यातील धार्मिक स्थळे खुले करण्यात

यावीत या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने राहुरीच्या विठ्ठल मंदिरात भजनाच्या कार्यक्रमा बरोबरच घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवाजी कर्डीले म्हणाले, कोरोना माहामारीचे संकट रोखण्यासाठी गेली ५ महिने जनतेने सहकार्य केले. दारूची दुकाने खुली करण्यास राज्यातील आघाडी सरकारकडून परवानगी देण्यात आली.

मात्र हिंदू म्हणून गप्पा मारणारे सत्तेसाठी मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेण्यास विसरले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, सुरसिंग पवार, रवींद्र म्हसे, कैलास पवार, सुभाष गायकवाड, अमोल भनगडे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात आण्णासाहेब शेटे,

वावरथचे माजी सरपंच अविनाश बाचकर, मयूर गवळी, डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, राहुरी खुर्दचे माजी सरपंच निसार शेख, खडांबेचे माजी उपसरपंच प्रभाकर हरिश्चंद्रे, बाबासाहेब शिंदे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, चांगदेव किणकर,

अंकुश बर्डे, बबन कोळसे, समीर पठाण, नगरसेवक शहाजी जाधव, रवींद्र म्हसे, विक्रम गाढे, बाळासाहेब खांदे, महेश खाटेकर, गायत्री गाढे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. निरीक्षक मुकुंद देशमुख व नायब तहसीलदार तळेकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News