१४ जानेवारी २०२५ राहुरी शहर : जलजीवन योजना ही जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकारी ठेकेदारासाठी आहे, हेच समजत नाही. त्यासाठी या प्रश्नावर संसदेच्या येत्या २९ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून जलजीवन योजनेची चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी खासदार निलेश लंके यांनी दिला.
राहुरी तालुक्यात घेतलेल्या आढावा बैठकीत तालुक्यात अनेक विभागात कोणतेही प्रश्न प्रलंबीत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.तालुक्यातील काम समाधानकारक असून काही विभागाच्या तक्रारी पाहता त्याबाबतीत चौकशी करून समक्ष पाहणी करण्यात येईल.रब्बी हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना खते मिळत नाही. खते घेताना लिकिंगचा आग्रह शेतकऱ्यांना केला जातो.
याबाबत शेतकऱ्यांनी जो प्रश्न उपस्थित केला, त्यावर तालुका कृषी अधिकारी शिंदे यांना जाब विचारला. त्यावर शिंदे यांनी तालुक्यातील कृषी सेवा केंद्राला त्याबाबतीत नोटीसा पाठवून लिंकिंग न करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सांगितले.खासदार लंके यांनी प्रथमच राहुरी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या प्रश्न जाणून घेण्यासाठी पंचायत समितीच्या डॉ. दादासाहेब तनपुरे तनपुरे सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीस माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, जलसंपदा विभागाचे विलास पाटील, सहाय्यक निबंधक दिपक पराये, गटशिक्षण अधिकारी मोहनीराज तुंभारे, तालुका कृषी अधिकारी शिंदे, नायब तहसीलदार संध्या दळवी, सचिन ठोंबरे, आरोग्य अधिकारी दीपाली गायकवाड, डॉ. चौधरी, राहुरी नगर परिषदेचे पराग दराडे, पंकज मेहेत्रे
अधीक्षक अधिकारी तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, उपसभापती बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदे राष्ट्रवादीचे पदाधिकारी मच्छिंद्र सोनवणे, राजूभाऊ शेटे, किरण कडू, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळघट, नंदकुमार तनपुरे, संतोष आघाव, महेश उदावंत, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख सचिन म्हसे, रामदास बाचकार, प्रकाश देठे, गोरक्षनाथ पवार, किशोर जाधव, सदस्य अश्विनी कुमावत, अभिजित शिरसाठ, दिगंबर घोगरे, संदीप निकम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
वांबोरी येथील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंजूर केलेल्या सौर कृषी वाहिनी योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झालेले असून केवळ श्रेय वादामुळे या कामाची चाचणी थांबली आहे,याबाबत खा. लंके यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांचेशी मोबाईलवरून संपर्क करून सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.यावेळी बाबासाहेब भिटे, रामदास बाचकर यांनीही प्रश्न मांडले.