Ahmednagar News : जलयुक्त 2 मध्ये जिल्ह्यातील 365 गावाचा समावेश

Ahmednagarlive24 office
Updated:
Jalyukt 2

Ahmednagar News : टंचाईच्या झळापासून मुक्त होत शिवार जलसमृद्ध व्हावे. पिण्याच्या पाण्याबाबत आत्मनिर्भरता यावी, हाच जलयुक्त. २ योजनेचा संकल्प आहे. जलयुक्त.२ मध्ये जिल्ह्यातील एकूण ३६५ गावांचा समावेश असून, या गावांत केल्या जाणाऱ्या जलसंधारण आराखड्यात तब्बल १८ हजार ७०३ कामांचा समावेश आहे.

‘जलयुक्त’साठी एकत्रीत परिश्रम करावे. जलसंधारणाची कामे निर्धारीत मुदतीत पूर्ण करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी यंत्रणा प्रमुखांना दिले आहे.

जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ या योजनेबाबत जिल्हास्तरीय समितीची नुकतीच बैठक दोन झाली. यावेळी ते बोलत होते. जल व मृदासंधारणाची कामे करीत शिवारात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवत शिवार जलसंपन्न करणे आणि पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जलयुक्त टप्पा दोन पुन्हा एकवार कार्यान्वित झाले आहे.

शासन निर्देशानुसार जलयुक्त टप्पा दोन योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.समितीने जलयुक्त योजनेत जिल्ह्यातील ३६५ गावांची निवड केली आहे.

निवडलेल्या गावात जलयुक्त योजनेश संबंधित अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त शिवार फेरी पूर्ण करीत संबंधीत गावात केल्या जाणाऱ्या कामांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. या ३६५ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या आराखड्यात तब्बल १८ हजार ७०३ कामांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe