जीपची टेम्पोला धडक; सहा जण जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला जोराची धडक बसल्याने जीपमधील असलेले सहा जण जखमी झाले आहेत.

दरम्यान हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे नाशिक पुणे महामार्गावर घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,

नाशिक पुणे महामार्गावर जीपने (एम.एच. १६ ए.जी. ६८९२) प्रवास करत असताना पुण्याच्या दिशेने जात असताना आंबी खालसा फाटा येथे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या टेम्पोला (एम.एच. १२ एन.एक्स. १२५८) या जीपने पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. तर प्रवासी बचावले आहे. या अपघातात चालक अभिजित चंद्रसेन आहेर, मयूर विजय बागुल,

तेजस कैलास आहेर, एकनाथ भाऊसाहेब आहेर, प्रीतम बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब रामनाथ आहेर सर्व रा. लोणी ता. रहाता हे जखमी झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment