दिवसा नातेवाईकाच्या लग्नासाठी दागिने घातले अन रात्री चोरट्यांनी …. ?

Pragati
Published:

Ahmednagar News : सध्या लग्नसराई सुरु आहे. यामुळे पाहुण्यांची वर्दळ असते. अशा गडबडीत चोरटे मात्र आपला हात साफ करत आहेत. अशीच घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घडली आहे.

यात सकाळी ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांचे लग्न असल्याने लग्नाला जाताना महिलेने अंगावर दागिने घातले होते. मात्र रात्री घराबाहेर झोपल्यानंतर चोरट्यांनी झोपेत असतानाच या महिलेच्या गळ्यातील सर्व दागिने घेऊन धूम ठोकली.

या चोरीच्या घटनेमुळे टाकळीभानसह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, टाकळीभान येथील खळवाडी परिरात संगिता रविंद्र तगरे या राहतात. त्यांना ऋषीकेश, रोहित, रोहन असे तीन मुले आहेत. हे सर्व एकत्र राहत आहेत. दरम्यान संगिता या सकाळी ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांचे लग्न असल्याने वडाळा महादेव येथे गेल्या होत्या. लग्नाला जाताना त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने, त्यात कानातील झुंबर, गळ्यातील गंठण व सर असे दागिने घातले होते.

लग्न लावून दुपारी ३ वाजता टाकळीभान येथे घरी आल्या. तेव्हा दागिने त्यांच्या अंगावरच होते. त्यानंतर जेवण करून त्या घराचे बाहेर झोपले तर मुले घरामध्ये झोपले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात काहीतरी आवाज आला, तेव्हा दोन इसम अंधारात पळताना त्यांनी पाहीले, म्हणून त्यांनी मुलांना आवाज दिला व आरडाओरडा केला.

मुलगा रोहन व ऋषिकेश धावत बाहेर आले. त्यांनी विचारपूस करून चोरांचा पाठलाग सुरू केला. मात्र चोर अंधाराचा फायदा घेवून जवळ असलेल्या ऊसात पळून गेले. तेव्हा त्यांनी गळ्यातील व अंगावरील दागिने तपासले असता ते चोरी झाल्याचे लक्षात आले.

या झालेल्या चोरीत १९ हजार ६०० रूयये किंमतीचा १ तोळा वजनाचा सोन्याचा सर, २१ हजार ४०० रुपये किमतीचे १ तोळा वजनाचे गंठण, २ हजार १०० रुपये किंमतीचे कानातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर असा अंदाजे ४३ हजार १०० रुपये किंमतीचे दागिने चोरी झाले आहेत.

तसेच संजय भास्कर तगरे हे घराचे बाहेर झोपलेल असतांना त्यांच्या उशापाशी ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल त्यात जीओ कंपनीचे सिमकार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद संगिता यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe