Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन व त्यानंतर प्रतिमा दहन करून मराठा आंदोलकांनी नेवासा येथील उपोषणाच्या ठिकाणी त्यांचा निषेध केला.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून येथे साखळी उपोषण सुरू असून उपोषणाचा काल रविवारी तिसरा दिवस होता. अॅड. के.एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, संदीप आलवणे हे उपोषण करीत आहे.

उपोषणस्थळी अनेक संघटना व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी पोलीस उपायुक्त संजय पाटील, आटो रिक्षा संघटना, मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक सोमनाथ कचरे,
लहुजी सेनेचे भैरवनाथ भारस्कर, हिंदू एकता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जे. एन. वाकचौरे आदींनी समक्ष भेटून पाठिंबा दिला. जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विठलराव लंघे, डॉ. जयवंत गुडधे, समर्पण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले आदींनी समक्ष भेट दिली.













