नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने कापड बाजार, महात्मा गांधी रोड हा महत्त्वाचा असून व्यापारीकरणामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले जात आहे.
जिल्हाभरातून येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक निर्माण होऊन विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, शहरालगतची डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतील व व्यवसायीकरण वाढेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आ. जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक, लालटाकी, सर्जेपुरा, कापड बाजार, माळीवाडा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, अश्विनी जाधव, अनिता भोसले, अनिल पोखरणा, सुमतीलाल कोठारी, अरिफ शेख, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, चेतन जग्गी, राम वडागळे, पावलस पवार, विजय वडागळे,
शाहूराजे वडागळे, विजय ढोले, सागर मुर्तडकर, प्रदीप पंजाबी, मोहित पंजाबी, योगी सबलोक, राजू शर्मा, विकी इंगळे, जय भोसले, फिरोज तांबटकर, नितीन दरंदले, बलमीम कराळे, योगेश सोनवणे, पप्पू पाटील, प्रकाश सेंदर, रितेश नय्यर अजय ढोले, संजय ढोले, इम्रान शेख, प्रशांत म्हस्के, दानिश शेख, गणेश राऊत, गणेश कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कापड बाजार महात्मा गांधी रस्त्याचे काम नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागावे यासाठी मोठा निधी मिळाला असून रस्त्याचे काम ताबडतोब सुरू झाले आहे. पत्रकार चौक, सर्जेपुरा, तेलीखुंट पर्यंत रस्ता काम पूर्ण होणार आहे.
दिवाळी सण जवळ आल्यामुळे कापड बाजारातील रस्त्याचे काम नंतर केले जाणार आहे, जेणेकरून व्यापारी व ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शहरामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी विकास कामे सुरू असल्यामुळे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
त्यांचे प्रेम पाहून केलेल्या कामाचे समाधान झाले या माध्यमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झाला असल्याचे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले. तसेच अजून चांगले काम करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.