अहिल्यानगर : तालुक्यातील क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेचा अखेरचा टप्पा फुलोर बाग यात्रा व निशान भेट कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सायंकाळच्या सुमारास नाथांची पालखी, पंचधातूचा घोडा व कावडी बरोबर आलेले मानाचे ध्वज यांची भेट गावातील लक्ष्मी माता मंदिर परिसरात झाली. हा सोहळा खूप प्रेक्षणीय असतो. तेलंगणा राज्यातील बंजारा समाजातील भाविक देवाच्या स्वागताला या ठिकाणी येऊन मिरवणुकी पुढे बंजारा नृत्य करत आपली सेवा रुजू करतात.
गुढीपाडव्याच्या महापूजेने मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेची सांगता होते. फाल्गुनी अमावस्या हा नाथांचा प्रकट दिन समजला जातो. या दिवशी संपूर्ण परिसर वृक्षवेली त्याकाळी प्रभावित होऊन दवणा वनस्पती विविध फुले पानांनी निसर्ग बहरला, चैत्रपाल विने नाथांचे स्वागत केले सुगंधाची दरवळ सर्वत्र पसरली. सर्वसृष्टीला नवा फुलोराला म्हणून यात्रेच्या या टप्प्याला फुलोर बागयात्रा म्हणतात.

पैठण येथून आलेल्या सुमारे ४० हजार कावडीने नाथांच्या समाधीस जलाभिषेक केला, उत्तर भारतातून दक्षिणेकडे भ्रमंती करताना नाथांनी ज्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली ते ठिकाण मढी निवडंूगे गावाच्या सीमेवर असून तेथे यात्रा भरते. छत्रपती शाहू महाराजांनी गडाचे काम पूर्ण केल्यावर फाल्गुनी अमावस्येला पैठणचे वेदशास्त्र संपन्न पंडित गंगाधर पंत दीक्षित यांच्या हस्ते नाथांच्या समाधीला गंगाजल आणि अभिषेक केला गुढीपाडव्याच्या पहाटे होम हवन व अन्य धार्मिक विधी करत छत्रपतींच्या परंपरेनुसार नगारा वाद्य वाजवत पूजा विधी आधी प्रथा सुरू केल्या,
दुपारनंतर गडावरून नाथांची पालखी पंचधातूचा घोडा अशी मिरवणूक वाजत गाजत निघाली भेटीच्या स्थळी निवडूंगे येथून वाजत गाजत आलेले निशाण यांची भेट झाली. मढी, पैठण, सावरगाव, मिरी येथील स्वतंत्र निशान तर निवडुंगे, अंतराळ, साकेगाव, बाबुळगाव, कासार पिंपळगाव दुसरे यांचे मिळून एक असे निशाण मानाचे समजले जाते.
या सर्व निशाण ध्वजाच्या काठ्या एकत्रित बांधून पोलीस दलाकडून त्या ताब्यात घेतल्या जातात व त्यांचेमार्फतच देवाच्या पालखीला असा स्पर्श होतो. त्यानंतर मिरवणूक यात्रा सुरू होत.े कावड मिरवणूक दरम्यान लहान मुलांना कावडीच्या मार्गावर झोपवले जाते त्यांना ओलांडून कावडीवाले पुढे जातात यामुळे देवाची कृपा होऊन नकारात्मक शक्तीची बाधा मुलांना होत नाही अशी श्रद्धा भाविकांची आहे.
कावडीच्या स्नानानंतर सुगंधी उठणे विधी सुरू होऊन त्यानंतर महापूजा होते. पहाटेपासूनच संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून वारंवार वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली. भाविकांच्या मोठ्या संख्येपुढे एसटी महामंडळाचे नियोजन तोकडे पडले, २५ किलोमीटरचा परिसर वाहतूक कोंडीत हरवला.