कर्जत नगराध्यक्ष निवडणुक 16 फेब्रुवारीला तर 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ही निवडणुक 16 फेब्रुवारीला होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार आहे.

याबाबतची माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दरम्यान कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून

नगराध्यक्षपदासाठी 9 फेब्रुवारीला अर्ज भरता येणार आहे. त्यादिवशी दुपारी चार वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता ज्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.

त्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील. 14 फेब्रुवारी या दिवशी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत याची यादी नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्यात येणार आहे.

16 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये नगर पंचायत कार्यालयमध्ये निवडणूक पार पाडण्यात येईल. उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक याच दिवशी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe