अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील आठवडे बाजारात मुख्य रस्त्यावर प्रसिद्ध असलेल्या चिंचेच्या झाडाखाली भाजी विक्रेते व इतर साहित्य विक्रेत्यांजवळ काही ग्राहक व महिला भाजीपाला खरेदी करत असताना
या महिलांभोवती घोळका करून व त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असणाऱ्या पर्स व पिशवीत हात घालून चोरीचा प्रयत्न करताना चार महिला आढळल्या.
त्यावेळी कर्जत पोलीस भाजी विक्रेते सुभाष सायकर, तुळशीराम सायकर, संजय राऊत आदींनी महिला कॉन्स्टेबल यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेत असताना त्यातील दोन महिला पळून जाऊ लागल्या.
मात्र पाठलाग करुन महिला कॉन्स्टेबल पुरी यांनी त्यांना आपल्या ताब्यात घेत राशीन पोलिस ठाण्यात आणले. ललिता अमोल पवार वय-२८ (रा.अरणगाव ता.जामखेड), राधिका मनोहर काळे वय-२१ (रा.पाथरुड ता. भुम),
चिंगु समिर सय्यद वय-२१ (रा.नेवासा फाटा ता.नेवासा), राणी किरण काळे वय-३५ (रा. पाथरुड ता.भुम) अशी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम