कास्ट्राईबची ऑनलाईन सेवा शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांसाठी दुवा ठरणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट्राईब संघटना सतत प्रयत्नशील आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचार्‍यांचे अनेक न्याय हक्काच्या मागण्या सोडविण्यात आल्या आहेत. शासन स्तरावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु आहे.

ही ऑनलाईन सेवा सर्व कर्मचार्‍यांसाठी दुवा ठरणार असून, सर्व कर्मचारी व विभाग एकमेकाशी जोडले गेले असून, असंघटित कामगारांना देखील एकत्रित आनण्याचे कार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या ऑनलाईन सेवेचा शुभारंभ राज्य अध्यक्ष पवळे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद येथील कास्ट्राईबच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राज्य उपाध्यक्ष सयाजी खरात, राज्य सहसचिव निवृत्ती आरु,

नाशिक विभागीय अध्यक्ष ना.म. साठे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सरचिटणीस सुहास धीवर, कार्याध्यक्ष वसंत थोरात, अतिरिक्त सचिव गुलाबराव जावळे, महिला जिल्हाध्यक्षा नंदा भिंगारदिवे, परिचारिका जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, कार्यााध्यक्ष मायाताई जाधव, सचिव मनिषा साळवे,

शहराध्यक्ष दत्ता रणसिंग, जय हिंद सोसायटीचे उद्मले, श्याम थोरात, सोमनाथ शिंगाडे, बुध्दानंद धांडोरे, आरिफ शेख, इरफान शेख आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष के. के. जाधव म्हणाले की, जिल्ह्यात महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व विविध कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे कार्य केले जात आहे.

या ऑनलाईन सेवेद्वारे सर्व तहसिल कार्यालय, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकमेकांशी जोडले गेल्याने कर्मचार्‍यांची सोय होणार आहे. तसेच बांधकाम कामगार, गवंडी, मजुर, सुतार, पेंटर आदि असंघटित कामगारांची नोंदणी यामध्ये करण्यात येणार आहे.

शासकीय, निमशासकीय व असंघटित कामगारांचे प्रश्‍न सुटण्यास देखील मदत होणार असल्याचे सांगून, डीसीपीएस व नोकर भरतीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या नंदा भिंगारदिवे, ज्योती पवार, मनीषा साळवे यांनी कोरोनाच्या संकटकाळात उत्तम कार्य केल्याबद्दल कास्ट्राईबच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धीवर यांनी केले. आभार ज्योती पवार यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment