अहिल्यानगर : सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत निर्माण होत आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाबाबत काहीसे मागे आहेत. मात्र आता ही दरी देखील दूर होणार आहे कारण आता लवकरच रयतच्या शाळांतून एआय’ तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येणार आहेत ,अशी माहिती देशाचे माजी केंद्रिय कृषी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी दिली.
अहिल्यानगर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या चिचोंडी पाटील शाखेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन खा.पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे वैशिष्टय असे आहे की, संस्थेचे अनेक विद्यार्थी दानुशुर व्यक्तित्व आहेत. ते रयत शिक्षण संस्था शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.

लवकरच संस्था रयतच्या सर्व शाळातून एआय तंत्रज्ञान संबंधित शिक्षण देण्यास सुरुवात करेल. येथील उभा असलेली शाळेची सुंदर वास्तु उभारण्यात केवळ ग्रामस्थांनीच नाही तर दूरची रायगड जिल्ह्याचे राम ठाकूर सारख्यानी मोलाची मदत केली. ते खासदार होते पण त्यांना राजकारणात रस नाही तर समाज कारणात रस आहे. ते दरवर्षी रयत शिक्षण संस्थेस कमीत कमी पाच कोटी रुपयांची मदत करतात. ते रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेऊन व्यावसायात यशस्वी झाले असून संस्थेस मदत देतात.