व्यापार्‍यावर हल्ला करणारा खटावकर अखेर जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात अनेक दिवसांपासून पसार असलेला आरोपी अक्षय नवनाथ खटावकर (रा. भिस्तबाग महालाजवळ, सावेडी) याला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.

त्याने पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

2 जानेवारी 2022 रोजी रात्री तरूण व्यापारी सागर नवनाथ शेडाळे (वय 26 रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी) हे भिस्तबाग चौकातील गजराज ड्रायक्लीन फॅक्टरीसमोर दुचाकीवरून जात असताना

खटावकर याने शेडाळे यांच्या दुचाकीला त्याची दुचाकी आडवि लावली होती. पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून शिवीगाळ करत शेडाळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी खटावकर पसार होता. पोलिसांनी त्याला सोमवारी सावेडी उपनगरात अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe