Ahmednagar News : अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने मुलीस पळवणारा मित्राच्या सहाय्याने अटकेत !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साजन सुदाम माळी, वय-२२ रा. राहुरी खुर्द याने मित्राच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवून नेले होते.

त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या वर ९.११.२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात भादंवि कलम ३६६, ३७६ (२) (एन), पोक्सो अॅक्ट कलम ४, ८, १२ वाढविण्यात आले होते.

सदर गुन्हयात आरोपीस मदत करणाऱ्या विकास नामदेव बडे, वय- २०, रा. राहुरी खुर्द याला दि. ६ फेब्रुवारी रोजी अटक केली होते. त्यानंतर तपास करून सदर गुन्हयातील पीडित मुलीला तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

त्यानंतर गुन्हयातील आरोपी साजन सुदाम माळी याला ११ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विद्यार्थ्यांत प्रबोधन

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे बावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी वांबोरी येथील विद्यालय येथे विद्याथ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले व अपहरणाच्या कायद्याविषयी माहिती दिली.

तसेच त्यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास कुणी सहकार्य करत असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला कळवावी.

आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आव्हान करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe