Ahmednagar News : भर दिवसा मैत्रिणीसह युवकाचे अपहरण, शाळेच्या मोकळ्या मैदानावर आणत जबर मारहाण..

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : लॉजसमोर मैत्रिणीसोबत बोलत असताना काही युवकांनी तरुणासह मैत्रिणीचे अपहरण केले. त्यांना एका शाळेच्या मोकळ्या मैदानात आणून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी नगर शहरात घडली.

हिमांशु शरद जाधव (वय २१, रा. वाघोली, पुणे, मुळ रा. बोरद, ता. तळोदा, जि. नंदुरबार) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अत्तु शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नगर) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी : हिमांशु हे वाघोली येथे इंजिनीअरींगचे शिक्षण घेत असून ते रविवारी दुपारी नगर शहरात होते. शहरातील अभय लॉजसमोर त्यांच्या मैत्रिणीसोबत बोलत ते उभे होते. तितक्यात अत्तु शेख हा त्याच्या तीन साथीदारांसह तेथे आला.

त्यांना मारहाण केली. दमदाटी करून बळजबरीने दुचाकीवर बसवत त्यांच्या मैत्रिणीला देखील बळजबरीने तिच्या दुचाकीवर बसवून दोघांना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका शाळेच्या मोकळ्या मैदानावर नेले असे फिर्यादीत म्हटले आहे.

तेथे गेल्यानंतर त्या चौघांनी हिमांशु व त्यांच्या मैत्रिणीला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मैत्रिणीच्या वडिलांना बोलून घेत त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हिमांशु यांची सुटका केली. पोलिसात तक्रार केल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe