अहमदनगर शहरातील एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला असून, त्या वकिलाने दिलेल्या फिर्यादीत किरण काळे व त्याच्या साथीदाराने हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातून वाचण्यासाठी किरण काळे हे बेताल वक्तव्य करत आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, फिर्यादी वकिलाच्या सांगण्यावरून निदर्शनास येते की, किरण काळे हाच या गुन्ह्याचा खरा मास्टरमाईंड असून त्याला पोलिसांनी अटक करून योग्य तपास करत या घटनेचे सत्य समाजासमोर आणावे.
वकिलावर हल्ला झाला याची माहिती मिळताच मी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो त्यावेळी जखमी वकिलाला स्ट्रेचरवरून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करण्यात येत होते, त्यावेळी वकिलाच्या मित्रांनी सांगितले की, आमच्याकडे गाडी नाही तरी तुमच्या गाडीत मॅक केअर हॉस्पिटलला घेऊन जाता का अशी विनंती केली.
शहरात जेव्हा जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा तेव्हा मी सर्वात आधी घटनास्थळी जात सामाजिक भावनेतून मदतीचा हात देत असतो. वकील व माझे आत्ताचे आणि यापूर्वीचे सीडीआर तपासण्यात यावे,
किरण काळे राष्ट्रवादीवर आरोप करत प्रसिद्धी मिळवत असतात व त्या माध्यमातून उत्तरेतील नेत्याला खुश ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरु असून, त्यांना न्यूरो सर्जनची गरज आहे.
त्यांनी मनपाच्या एमआरआय सेंटरमध्ये मेंदुची तपासणी करून घ्यावी व उपचार करुन घ्यावेत. अन्यथा काही दिवसातच चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली.
अन्यथा अबू नुकसानीचा दावा दाखल करू
सार्वजनिक जीवनात वावरत असताना आतापर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसून, किरण काळे यांनी एसपी कार्यालय तोडफोड प्रकरणी आरोपी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे माझी बदनामी केली तसेच मनपा भष्ट्राचार प्रकरणी माझा संबंध नसताना माझ्यावर आरोप केले.
कटकारस्थानाचा गुन्हा दाखल आहे, मात्र माझा या प्रकरणाशी दूरपर्यंत संबंध नाही. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही तरीही कुठलेही तथ्य नसताना तडीपार करण्याची खोटी मागणी केली आहे. तरी किरण काळेंनी माफी मागावी अन्यथा अबू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल असा इशारा अभिजित खोसे यांनी दिला आहे.













