कोपरगाव : राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाचा ‘आमदारांना’ घरचा आहेर !

Ahmednagarlive24 office
Published:

कोपरगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठाप्रकरणी मुख्याधिकारी कारभाराविरोधात भाजप आक्रमक असताना आता भाजपपूर्वीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षाने निवेदन देऊन घोषणा देत

पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने आपल्याच आमदारांना घरचा आहेर दिल्याची टीका भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कोपरगाव शहरात पुरवठा झालेल्या गाळ मिश्रित गढूळ पाण्याच्या घटनेचा शहरातील विविध स्तरातून निषेध होत आहे. भाजपने मुख्याधिकाऱ्यांना व आमदारासह त्यांचे स्वीय सहाय्यक यांना याप्रकरणी धारेवर धरले आहे.

मात्र या प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी शिष्टमंडळाने जाऊन गाळमिश्रीत पाण्याबाबत निवेदनाद्वारे निषेध नोंदविल्याने आमदारांना घरचाच आहेर दिल्याची चर्चा काल रविवारी शहरात होती. यावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे यांनी टीका केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

कोपरगाव शहराला आठ दिवसातून एकदा पाणी मिळते ते पाणी स्वच्छ मिळावे, ही नैतिक जबाबदारी विद्यमान आमदार आशुतोष काळे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची आहे. मात्र दौघेही आपली जबाबदारी सपशेल झटकून टाकत असल्याचा आरोप राक्षे यांनी केला.

शहरातील विविध प्रश्नावरून पालिकेच्या कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आता आंदोलन करू लागल्याने आमदार काळे व मुख्याधिकारी गोसावी यांच्यातील साटेलोटेबाबतची चर्चा सुरू असल्याचे राक्षे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe