Ahmednagar News : कोपरगाव शहर विकासासाठी छोट्या- मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली.
यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

रविवारी (दि.१७) येथील ग्राहक सन्मान योजनेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. आपली खरेदी, आपल्या गावात, यासाठी आपण स्वतः पत्नी चैताली समवेत आपल्या बाजार पेठेत दिवाळीची खरेदी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी संगमनेरचे उद्योगपती संजय मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी आ. काळे म्हणाले की, कोपरगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. यापुढील काळातही देत राहील त्याबाबत आपण निश्चित रहावे.
मालपाणी उद्योगाचे उद्योग व्यवसायात मोठे योगदान आहे. त्यांचे देखील मार्गदर्शन घेऊन कोपरगावच्या बाजारपेठेला फायदा होणार आहे. त्याच बरोबर आपल्या शहर व तालुक्यात देखील अनेक यशस्वी उद्योजक आहेत, त्यांचे देखील आपण मार्गदर्शन घेतल्यास आपली बाजार पेठ फुलण्यास मदत होणार आहे.
यावेळी आ. काळे यांनी कर्मवीर काळे कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने उद्योजक संजय मालपाणी यांचा सत्कार केला. याप्रसंगी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, तुलसीदास खुबाणी,
सचिव धरमचंद बागरेचा, सुधीर डागा, प्रदीप साखरे, अजित लोहाडे, राजेंद्र बंब, राम थोरे, सुमित भट्टड, मोहन उकिरडे, किरण शिरोडे, तुषार घोडके, गुलशन होडे, संदीप राशिकर, पवन डागा, संदीप काबरा,
प्रदीप मुंदडा, शाम जंगम आदींसह कृष्णा आढाव, अशोक आव्हाटे, मंदार पहाडे, रमेश गवळी, सुनील शिलेदार, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, गणेश बोरुडे, सोमनाथ आढाव, नारायण लांडगे, संतोष शेजवळ, अनिरुद्ध काळे आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.