‘त्या’ मुक्या प्राण्यांसाठी कोतवाली पोलिस ठरले ‘देवदूत’

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कोठी चौक स्टेशन रोडने एका पिकअप टेम्पोमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली.(Ahmednagar Crime)

यावेळी पोलिसांनी या पिकचा सिनेस्टाईल पाठलाग करून सुमारे ३ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोघेजण ताब्यात घेतले आहेत.

त्यामुळे या जनावरांसाठी कोतवाली पोलिस देवदूत ठरले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कोतवालीच पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारने माहिती दिली की, एका पिकअप व्हॅनमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिस स्टेशनचे पथकातील कर्मचाऱ्यांनी स्टेशन रोडवर सापळा लावला. सायंकाळी ६ वाजता एक पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो (क्र.एमएच ११ एजी ६७९५) हा सर्व बाजुने ताडपत्री असलेला दिसला.

सदर टेम्पोचा संशय आल्याने पोलिसांनी सदर टेम्पो चालकाला थांबण्याचा इशारा केला परंतु टेम्पो चालकाने टेम्पोचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचा सिनेस्टाइल पाठलाग करून गाडी आडवी लावत. ताडपत्री सोडुन पाहणी केली असता आत जर्सी व गावरान गायी व एक वासरु असे मिळुन आले.

त्यांना सदरची गोवंशीय जनावरे कोठुन आणली व कोठे घेवून चालला असे विचारले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली.

मात्र सदरची गोवंशीय जनावरे ही कत्तल करण्याच्या उद्देशाने घेवून जात असल्याने पिकअप टेम्पो व त्यातील जनावरे असा एकूण ३ लाख ४१,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी किरण सुनिल दांगडे, राम अनिल दांगडे ( दोघेही रा.वाळकी ता. जि.अहमदनगर) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पीकअप टेम्पो (क्र.एमएच ११ एजी ६७९५) ताब्यात घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe