अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात घरफोडी करणारे चोरटे पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. किशोर तेजराव वायाळ (वय ४५, रा. मेरा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा),
गोरख रघुनाथ खळेकर (वय ३४ शिरसवाडी, ता. जालना, जि. जालना हल्ली रा. सातारा परिसर, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, फिर्यादी आपल्या सारसनगर येथील घराचे सर्व दरवाजे व्यवस्थित लावून काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. परंतु जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना दरवाज्याचे कुलूप दिसले नाही.
तसेच दरवाजा लोटलेला दिसला. त्यावेळी दरवाजा उघडून आत गेले असता, घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम २ लाख ८७ हजार ५०० रु रकमेचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना पोलिसांना गुप्तबातमीदारमार्फत बातमी मिळाली.
घरफोडीतील आरोपी हे शिरुर बसस्थानक येथे येणार आहेत, या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला. या दरम्यान दोघेजण मिळून आले. त्यांना शिरुर पोलीस ठाण्यात पोलिस घेऊन गेले.
दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. हे सदर आरोपी हे पोलीस कोठडीत असतांना आरोपींना विश्वासात घेऊन त्यांना इतर गुन्ह्याबाबत चौकशी केली. आरोपींनी अहमदनगर शहरात घरफोडी केल्याचे सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम